दिवाळी चा सण म्हणजे आनंदाचा क्षाण
वर्षातून एकदा येतो ते पण चार दिवस
सगळे अगदी आनंदात असतात
तयारी करतात आधी महिनाभर
दिवाळी चा सण म्हणजे आनंदाचा क्षण
श्री रामचंद्रांचा अयोध्या आगमन सोहळा
अंधारावर प्रकाशाची मात आणि वाईटावर चांगल्याची मात
आनंदाने क्षण जगायचा आणि प्रेमाची उधळण करण्याचा दिवस
दिवाळी चा सण म्हणजे आनंदाचा क्षण
सकाळचे अभ्यंग स्नान आणि फटाक्यांची आतिषबाजी
उटण्याचा वास आणि अत्तराची भुरळ
भरपूर खरेदी आणि शुभेच्छांची रेलचेल
दिवाळी चा सण म्हणजे आनंदाचा क्षाण
दिवाळी म्हणल की आठवतो फराळ आणि नुसती मजा
सगळ्यांची भेट आणि गप्पांची ती मैफिल
दिवाळीच्या त्या सुट्ट्या आणि
मामाच्या गावाला जायची ती गडबड
दिवाळी म्हणजे आनंदाचा क्षण
मोठ्यांचा मान आणि छोट्यांची माया
घरातील स्त्री चा आदर तर लक्ष्मी चा मान
नवरा बायकोच नात तर बहीण भावाच प्रेम
यासगळ्यांची सांगड म्हणजे दिवाळी चा सण

सुंदर कविता....
उत्तर द्याहटवाThank You ☺️
उत्तर द्याहटवा