भाषा कोणतीही असो,
महत्त्व आहे शब्दाला,
केवळ शब्दामुळेच समजते,
भाषेतील भावना ...
शब्द कोणताही असो,
महत्त्व आहे लिहिण्याला,
केवळ लिहिलं कसं यावरून समजते,
शब्दातील भावना ...
शब्द कोणताही असो,
त्याला अर्थ हजार,
काना, मात्रा, वेलांटी देते,
शब्दांना मान ...
शब्द कोणताही असो,
कसा व्यक्त होतो,
यामुळेच कळतात समोरच्याच्या,
मनातील व्यथा ...
शब्द कोणाचाही असो,
जुळतात मने, तुटतात नाती,
त्यामुळेच जुळतात दोन,
जीवांच्या भावना ...
शब्द कोणताही असो,
व्यक्त व्हायला मदत करतो,
कधी कधी तो नाही बोलला तरी कळतात,
मनातल्या भावना ...
शब्द कोणताही असो,
तो जपून वापरावा नाहीतर,
दुखावतात दोन माणसांच्या,
हृदयातील भावना ...
शब्द शब्द आहे मोठा,
दिसतो जरी तो छोटा,
तरी ठरतो सर्वांच्या आयुष्यातील नात्याचा,
धागा प्रेमाचा ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा