मैत्रीच नात काही वेगळच असत,
कधी भेटतो, कधी बोलतो,
कधी संवाद होतो आणि मन जुळतात
कळतच
नाही...
मैत्रीच नात काही वेगळच असत,
जुळली मने, जुळले विचार,
कधी जुळतात भावना आणि बंध,
कळतच
नाही...
मैत्रीच नात काही वेगळच असत,
कधी भांडलो, कधी रुसलो,
कधी मन आणि ह्रुदय जुळत,
कळतच नाही...
मैत्रीच नात काही वेगळच असत,
कधी चिडलो, कधी ओरडलो,
कधी एकमेकात आणि मनामनात कनेक्ट होऊन
जातो,
कळतच नाही...
मैत्रीच नात काही वेगळच असत,
कधी भावनात, कधी अंतर-मनात,
कधी त्या मैत्रिच्या
कट्ट्यावर तासंतास बसुन राहतो,
कळतच नाही...
मैत्रीच नात काही वेगळच असत,
कधी दुखः सांगताना, कधी सुख आठवताना,
कधी माया आणि जीवाला जीव
देउन जातो,
कळतच नाही...
मैत्रीच नात काही वेगळच असत,
कधी किस्से ऐकताना, कधी किस्से ऐकवताना,
कधी मैत्रीत आणि कधी मैत्रीच्या
सोनेरी क्षणात गुंतुन जातो,
कळतच नाही...❤

छानच मैत्री कविता
उत्तर द्याहटवाउत्कृष्ट कविता....
उत्तर द्याहटवाखूपच छान
उत्तर द्याहटवा💖👌👍
उत्तर द्याहटवाVery nice❤️👍
उत्तर द्याहटवाMustch ankita
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवा