क्षीतिज्या पलिकडे धेय असावे,
मनात असावी ती झेप,
गरुड़ भरारी ची ती तयारी,
आणि बाहुमध्ये बळ असावे,
उभारी भरारी साठी असावी,
शोधत रोज नवे आकाश,
तयारी असावी ती झुंजार,
कर्तव्या साठी तोड़ावेत,
आपुलकी आणि भावनांचे पाश,
कितीही दुःख झाले तरी,
चेहऱ्यावर असावेत हास्य सदा,
मनात उठावे ते तरंग हजार,
कितीही मोठ्या समस्या आल्या,
तरी ध्येय असावे कठोर फार,
मनात तसे ठासून भरावे,
वाटचाल तशी सुरू असावी,
खुप दिवसां पासून वाटतय,
तो दिवस फार काई नाही लांब,
विश्वास नेहमी स्वतःवर असावा,
मग येईल जगता आयुष्य,
अस एकदा तरी जगून पहाव,
अपयशाला रोज हिनवत राहावं,
यशाला जिंकत जाव ...
यशाला जिंकत जाव ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा