समाधान
समाधान म्हणजे काय खूप जणांना सुख असतं पण समाधान नसतं तर काही जणांना कमी सुख असल तरी खूप समाधान असतं याचं नक्की कारण काय असावं. समाधान म्हणजे काय तर आपल्याला असलेल्या गोष्टीत मिळालेल्या गोष्टीत आहेत त्या परिस्थितीत आहेत त्या सुखात सुख मानता येणं आणि त्यात सुद्धा खूप आनंदी राहता येणं म्हणजे खर समाधान. साधी गोष्ट आहे तुम्ही लहान असताना छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला हव्या असायच्या त्या तुमच्या हातात आल्या की आनंद व्हायचं तेव्हा खुललेली ती गालावरची खळी झोपे पर्यंत तशीच राहायची तर नंतर बालवाडीत बाईनी दिलेलं चोकलेट एखाद्या संख्येचा पाढा न चुकता म्हणाल्यावर जेव्हा शाबासकी मिळायची ना तर तेव्हा खर झालेला तो आनंद म्हणजे खर समाधान असायचं. जे आत्ता काहीही केल्यास मिळाल्यास मिळत नाही. अपेक्षेविना मिळालेला जो आनंद असतो त्यातच खर समाधान दडलेले असतं
लोक अस म्हणतात की समाधानी असावं. आणि माणसाचं समाधान कधी होतच नाही. तो सतत कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीची अपेक्षा करत असतो.
माणसाला इच्छा असाव्यात यात माझाही विरोध नाही इच्छा नसलेला माणूस आयुष्यात काही मिळऊ ही शकत नाही याही मताशी मी सहमत आहे पण....... त्यालाही कुठेतरी समाधानाची सीमा असायला हवी. तर च त्याला त्यातलं सुख आणि त्यातून मिळणारं समाधान प्राप्त होत असतं. आधी छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण करत असताना पण समाधान मिळत असायचं पण आता तेच तुम्हाला जे जमत नाही ते जरी तुम्ही केलं तरी क्षणार्धात तुम्हाला अस वाटायला लागतं की अरे यार....मी अजून हे केलं असतं तर माझ काम अजूनच छान झाल असतं.....बास समाधानाची व्याख्या करता येणार नाही कारण कोणाचं समाधान कशात आहे याचं काही मोजमाप करता येणार नाही......म्हणून च आयुष्यात खूप यश मिळवा सुख शोधा आणि मिळालेल्या सुखात समाधानी राहायला शिका कारण आज जे तुमच्या कडे आहे ते कित्येक लोकांचे स्वप्न सुद्धा असेल.....त्यामुळे समाधानी रहा आणि कायम आनंदी रहा
Thank you 😊

