गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२०

पंढरीचा विठुराया

पंढरी विठ्ठल रुक्मिणी वाळवंट नागरी भक्त कोरोणा महामारी गर्दी आषाढी कार्तिकी वारी वारकरिसंप्रदाय

पंढरीच्या विठुराया
कित्येक वर्षांची तुझी परंपरा
आज थांबली ना रे
महामारी ने या
युगे अठ्ठावीस उभा
भक्तासाठी विठेवर तू
करमेल का रे तुला
भक्ताला भेटल्या वाचून
आई रुक्मिणी सुद्धा
रुसली ना रे भक्तावर
पहिल का रे ती वाट
भक्ताची या आतुरतेने परत
किती दिवस झाले
नाही गर्दी चंद्रभागे वर
आषाढी तर गेली देवा
आता कर्तिकीला तरी
होईल का रे भेट आपली
उभा वाळवंट सारा
रिकामा राहील दिवस तरी किती
आस तुझा दर्शनाची
लागली आम्हा भक्ताला
आषाढीला ऐकलं देवा
आलो नाही भेटीला
कर्तिकिला तरी आता
घेशील का रे भेट देवा
सगळ्या जगाचा रे बाप तू
लेकराच संकट तुला
करता नाही का येत दूर
घालऊन टाक ती महामारी
मारून टाक तो कोरोणा
राहू दे देवा आता 
मस्कफ्री सगळ्यांना
मास्कफ्री सगळ्यांना

सोमवार, २३ नोव्हेंबर, २०२०

मैत्री असावी...

मैत्री असावी फुल गुलाब मीठ प्रेम झरा







मैत्री असावी,
खळखळत्या वाहत्या
नदीसारखी,
रातराणीच्या सुगंधासारखी
आकाशात दरवळणारी ...

मैत्री असावी,
गुलाबाच्या पाकळ्या सारखी
प्रेमाने एकमेकात
घट्ट धरणारी ...

मैत्री असावी,
मंद वाऱ्यासारखी
केसाची बट अलगद
झुलवणारी,
मनसोक्त हसणारी,
संकटसमयी धावुन
येणारी ...

मैत्री असावी,
शहाळा प्रमाणे
वरून कठीण पण आत थंड आणि
मधुर पाण्यासारखी ...

मैत्री असावी,
पावसाच्या
पहिल्या सरीसारखी
सुखाच्या सरींनी
चिंब भिजवणारी ...

मैत्री असावी,
जेवनातल्या मिठासारखी,
नसेल तर बेचव आणि असेल तर,
रुचकर जेवनासारखी ...

मैत्री असावी,
पहाटेच्या धुक्यासरखी,
थंडावा देणारी ...

मैत्री असावी,
उगवत्या सूर्या सारखी
नवा आशेचा किरण होऊन
आयुष्य तेजोमय कराणारी ...

मैत्री असावी,
पारिजातकाच्या फुलासारखी
नेहमी आंगण
सुगंधित करणारी ...

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२०

यशाला जिंकत जावं...

क्षितिज मन पंख यश गरुड उंच भरारी जिंकण जाव







क्षीतिज्या पलिकडे धेय असावे, 
मनात असावी ती झेप,
गरुड़ भरारी ची ती तयारी, 
आणि बाहुमध्ये बळ असावे, 
उभारी भरारी साठी असावी, 
शोधत रोज नवे आकाश, 
तयारी असावी ती झुंजार,
कर्तव्या साठी तोड़ावेत, 
आपुलकी आणि भावनांचे पाश, 
कितीही दुःख झाले तरी, 
चेहऱ्यावर असावेत हास्य सदा,
मनात उठावे ते तरंग हजार,
कितीही मोठ्या समस्या आल्या,
तरी ध्येय असावे कठोर फार,
मनात तसे ठासून भरावे,
वाटचाल तशी सुरू असावी,
खुप दिवसां पासून वाटतय, 
तो दिवस फार काई नाही लांब,
विश्वास नेहमी स्वतःवर असावा,
मग येईल जगता आयुष्य,
अस एकदा तरी जगून पहाव, 
अपयशाला रोज हिनवत राहावं,
यशाला जिंकत जाव ...
यशाला जिंकत जाव ...

सोमवार, १६ नोव्हेंबर, २०२०

दिवाळी

Diwali Padawa Bhaubeej Narak Chaturdashi diya lights Dipawali

दिवाळी चा सण म्हणजे 
आनंदाचा क्षाण 

वर्षातून एकदा येतो ते पण चार दिवस

सगळे अगदी आनंदात असतात

तयारी करतात आधी महिनाभर

          दिवाळी चा सण म्हणजे आनंदाचा क्षण

         श्री रामचंद्रांचा अयोध्या आगमन सोहळा

         अंधारावर प्रकाशाची मात आणि वाईटावर चांगल्याची मात

         आनंदाने क्षण जगायचा आणि प्रेमाची उधळण करण्याचा दिवस

दिवाळी चा सण म्हणजे आनंदाचा क्षण

सकाळचे अभ्यंग स्नान आणि फटाक्यांची आतिषबाजी

उटण्याचा वास आणि अत्तराची भुरळ 

भरपूर खरेदी आणि शुभेच्छांची रेलचेल

          दिवाळी चा सण म्हणजे आनंदाचा क्षाण

          दिवाळी म्हणल की आठवतो फराळ आणि नुसती मजा

          सगळ्यांची भेट आणि गप्पांची ती मैफिल 

          दिवाळीच्या त्या सुट्ट्या आणि 

           मामाच्या गावाला जायची ती गडबड

दिवाळी म्हणजे आनंदाचा क्षण 

मोठ्यांचा मान आणि छोट्यांची माया

घरातील स्त्री चा आदर तर लक्ष्मी चा मान

नवरा बायकोच नात तर बहीण भावाच प्रेम

यासगळ्यांची सांगड म्हणजे दिवाळी चा सण

          

मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२०

शब्दातील भावना

शब्द भावना प्रेम माणसे मन

भाषा कोणतीही असो,
महत्त्व आहे शब्दाला,
केवळ शब्दामुळेच समजते,
भाषेतील भावना ...

शब्द कोणताही असो,
महत्त्व आहे लिहिण्याला,
केवळ लिहिलं कसं यावरून समजते,
शब्दातील भावना ...

शब्द कोणताही असो,
त्याला अर्थ हजार,
काना, मात्रा, वेलांटी देते,
शब्दांना मान ...

शब्द कोणताही असो,
कसा व्यक्त होतो,
यामुळेच कळतात समोरच्याच्या,
मनातील व्यथा ...

शब्द कोणाचाही असो,
जुळतात मने, तुटतात नाती,
त्यामुळेच जुळतात दोन,
जीवांच्या भावना ...

शब्द कोणताही असो,
व्यक्त व्हायला मदत करतो,
कधी कधी तो नाही बोलला तरी कळतात,
मनातल्या भावना ...

शब्द कोणताही असो,
तो जपून वापरावा नाहीतर,
दुखावतात दोन माणसांच्या,
हृदयातील भावना ...

शब्द शब्द आहे मोठा,
दिसतो जरी तो छोटा,
तरी ठरतो सर्वांच्या आयुष्यातील नात्याचा,
धागा प्रेमाचा ...






रविवार, १ नोव्हेंबर, २०२०

स्वप्न ...


स्वप्न

स्वप्न म्हणजे ...
अतृप्त इच्छेचा कल्पवृक्ष,
मनातल्या भावनांचा चित्रपट,
आयुष्यातील गोष्टींचा आभास,

    स्वप्न म्हणजे ...
    अफाट कल्पनांचा वट्वृक्ष,
    आकाशातील पक्ष्यांचे थवे,
    शहाळातील सुमधुर पाणी,

स्वप्न म्हणजे ...
अथांग सगरातील लाटा,
जोरात पड्णारा धबधबा,
झूळझूळ वाहणारे पाणी,

    स्वप्न म्हणजे ...
    कवितेतील गोड शब्द,
    संगीतातील मधुर कडवे,
    अनुभवातील गोड सार,

स्वप्न म्हणजे ...
भावनेचा गंध,
अर्थात स्वप्नगंध ...

नवा संसार ❤️

माहेर माझे बार्शी,  सासर आहे परांडा,  काय सांगू,  एका तासाच तर आहे,  अंतर यात,  बार्शी त आहेत भगवंत,  परंडा त आहेत अल्ला,  सासर माहेर जोडता ...