स्वप्न म्हणजे ...
अतृप्त इच्छेचा कल्पवृक्ष,
मनातल्या भावनांचा चित्रपट,
आयुष्यातील गोष्टींचा आभास,
स्वप्न म्हणजे ...
अफाट कल्पनांचा वट्वृक्ष,
आकाशातील पक्ष्यांचे थवे,
शहाळातील सुमधुर पाणी,
स्वप्न म्हणजे ...
अथांग सगरातील लाटा,
जोरात पड्णारा धबधबा,
झूळझूळ वाहणारे पाणी,
स्वप्न म्हणजे ...
कवितेतील गोड शब्द,
संगीतातील मधुर कडवे,
अनुभवातील गोड सार,
स्वप्न म्हणजे ...
भावनेचा गंध,
अर्थात स्वप्नगंध ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा