शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२०

आई

आई

आई बद्दल काय लिहू
लिहिल तेवढं कमीच आहे,
जगात साऱ्या माझा मनात
तीच सर्वस्वी देव आहे. 

जगात या येण्या आधी मी
ठेवला विश्वास एवढा तू
फेडू शकेल का ग मी
थोड तरी तुझ ऋण. 

पडले असतील कष्ट तुला
मला आजवर पोसायला,
म्हातारपणी तुझा मी
प्रयत्न तरी करेल जपायचा तुला.

इतके माझे लाड पुरवले
एका शब्दाने बोलली नाहीस,
परताव्यात त्याचा तुझा मी
करू शकेल का भर थोडी.

प्रत्येक गोष्ट शिकवताना
नसशील का ग दमली तू,
यशासाठी माझा तरीही
केले किती प्रयत्न तू.

आशीर्वाद कायम तुझा
असुदेत माझा डोक्यावर,
प्रत्येक कार्यात माझा
असुदेत सहभाग कायम.

जेव्हा माझावर सावली तुझी
नाही डगमनार मी कधी,
माझा प्रत्येक गोष्टीत मला
साथ फक्त तुझी हवी.

प्रत्येक जन्मात मला मिळावी
आई फक्त तू आणि तू,
कुशीत तुझ्या मला तू
घेशील का ग परत तू.

जगात सगळ्या या तू
आहे लय भारी तू,
प्रत्येक लेकराला
आई तुझा सारखी मिळो.

४ टिप्पण्या:

नवा संसार ❤️

माहेर माझे बार्शी,  सासर आहे परांडा,  काय सांगू,  एका तासाच तर आहे,  अंतर यात,  बार्शी त आहेत भगवंत,  परंडा त आहेत अल्ला,  सासर माहेर जोडता ...