दसर्याला आपट्याचे पान सोन म्हणुन का लुटतात ?
धृतराष्त्र व गांधारी यांना शंभर पुत्र होतात. त्यांना कौरव म्हणतात. तर, पंडुराजा व कुंती यांना पाच पुत्र होतात. त्यांना पांडव असे म्ह्णतात. पुढे जाउन यांच्यात युद्ध व्हायला लागत. ते खुप वाढतच जात. त्यात त्यांच युद्ध करायच ठरत, त्यात अट अशी असते कि, जो हारेल त्याला बारा वर्ष अज्ञान वणवास भोगावा लागेल. अज्ञान वणवास म्हणजे विरुद्ध स्पर्धकाला आपण वणवास भोगत आहोत, तो कुठे भोगत आहोत, कश्या परिस्थीतीत आहोत हे कळता कामा नये, जेव्हा ते कळेल तेव्हा केलेला सगळा वणवास संपुष्टात येउन, त्या दिवसा पासुन परत नविन बारा वर्षाचा कालखंड चालु होईल. असे ठरते. जिंकेल त्याला यात पांडव हरतात. पाडवांना राज्य मिळु नये यासाठी कौरव सतत प्रयत्नशिल असयचे. परंतु अचानक काही कालखंडा नंतर विराट नगरी मधे पांडव त्यांचा वणवास पुर्ण करतात. आणि विराट नगरी मधे प्रगट होतात. आणि हा एवढा कठीण विजय पांडव मिळवतात. याचा जल्लोश, आनंद म्हणुन ते त्यांची शस्त्रे आपट्याच्या झाडावर मारतात व त्याची पाने घेउन कौरवांकडे येतात, आणि हा दिवस दशमी चा असतो, दशमी च्या दिवशी मिळालेला हा विजय, वाईटावर चंगल्याचा विजय, अंधकारावर प्रकाषाचा विजय, म्हणुन हा दशामिचा दिवस विजयाचा दिवस विजयादशमी म्हणुन सजरा करतात, व या दिवशी प्रात्येक लहान व्यक्ती मोठ्या व्यक्तीला अपट्याची पाने सोने म्हणुन देतो.

मस्तच माहिती.... आजपर्यंत हे माहितीच नव्हते...
उत्तर द्याहटवा