शनिवार, १० एप्रिल, २०२१

जगुणी बघावे

swapngandh life flowers love

फुले असावी रंगबिरंगी, 
मोहित करून टाकणारी,
घरात मग ती सजवावी,
फुलदाणी जशी फुलून दिसावी, 
पंख असावे नक्षीदार,
गिरकी घेणाऱ्या फुलपाखरा वरती,
आकाशात त्या उडणाऱ्या,
फुलपाखराच्या सौंदर्याला तोड,
नसावी इवल्याशा जीवनाची,
असले छोटे जग जरी,
नसावी खंत त्याची मनी,
मनसोक्त ते आयुष्य जगावे,
फुला सारखे उमलून,
सुगंधा सारखे पसरत जावे, 
क्षणा क्षणाच्या लाटांवर, 
आयुष्य फुलत जावे, 
अश्रू असावे कुणाचेही, 
आपण मात्र विरघळत जावे, 
नसो कोणीही आपले, 
आपण मात्र असावे सगळ्यांचे,
आयुष्य आहे क्षणभंगुर,
ते मात्र भरभरून जगावे.

बुधवार, १० फेब्रुवारी, २०२१

रिचार्ज

रिचार्ज life morning Routine space feelings








सकाळी सकाळी लवकर उठून
शरीरासाठी Exercises करू
दिवसभरात न दमण्यासाठी
पुन्हा एकदा रिचार्ज करू

दिवसभराचा अढावा घेऊ
एकत्र बसून मस्त
नाष्टा घेत कुटुंबासमवेत
पुन्हा एकदा रिचार्ज करू

ऑफिस चा तो पोशाख घालून
निघण्याची तयारी करू
सहकाऱ्यांच्या कॉल वर
पुन्हा एकदा रिचार्ज करू

सायंकाळी कट्ट्यावर बसू
कामाच्या त्या सुटकेचा सुस्कारा सोडू
चहाच्या त्या कपाने
पुन्हा एकदा रिचार्ज करू

मित्र मैत्रिणीच्या गाठी घेऊन
मस्त गप्पा मध्ये रमून जाऊ
खांद्यावरच्या हातावर डोकं ठेऊन
पुन्हा एकदा रिचार्ज करू

रात्रीच्या त्या चंद्र प्रकाशात
आठवणींना उजाळा देऊ
प्रेमाच्या त्या दुनियेत मग
पुन्हा एकदा रिचार्ज करू

सोमवार, ८ फेब्रुवारी, २०२१

सेल्फी

Selfi mobile phone capture photo status

सेल्फी काढू म्हणून,
हात वर करायचा,
तोंड वाकडी करून,
आकाशाकडे पहायचं ...

काय हे वेड लागले,
आपलेच फोटो काढून, 
आपणच अपलोड करायचे,
तरीही त्याकडे बघून हसायचे ...

सेल्फी मध्ये दंग सारे,
प्रत्येक क्षण capture झाले,
अपलोड करताच स्टेटस सारे,
रिप्लाय बघण्यात गर्क झाले ...

शुल्लक शुल्लक गोष्टींचे,
फोटो टाकतो आम्ही,
नाहीच आला कुणाचा रिप्लाय,
की क्षणात चिडतो आम्ही ...



समाधान

समाधान समाधान म्हणजे काय खूप जणांना सुख असतं पण समाधान नसतं तर काही जणांना कमी सुख असल तरी खूप समाधान असतं याचं नक्की कारण काय असावं. समाधान...