फुलदाणी जशी फुलून दिसावी,
पंख असावे नक्षीदार,
गिरकी घेणाऱ्या फुलपाखरा वरती,
आकाशात त्या उडणाऱ्या,
फुलपाखराच्या सौंदर्याला तोड,
नसावी इवल्याशा जीवनाची,
असले छोटे जग जरी,
नसावी खंत त्याची मनी,
मनसोक्त ते आयुष्य जगावे,
फुला सारखे उमलून,
सुगंधा सारखे पसरत जावे,
क्षणा क्षणाच्या लाटांवर,
आयुष्य फुलत जावे,
अश्रू असावे कुणाचेही,
आपण मात्र विरघळत जावे,
नसो कोणीही आपले,
आपण मात्र असावे सगळ्यांचे,
आयुष्य आहे क्षणभंगुर,
ते मात्र भरभरून जगावे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा