सेल्फी काढू म्हणून,
हात वर करायचा,
तोंड वाकडी करून,
आकाशाकडे पहायचं ...
काय हे वेड लागले,
आपलेच फोटो काढून,
आपणच अपलोड करायचे,
तरीही त्याकडे बघून हसायचे ...
सेल्फी मध्ये दंग सारे,
प्रत्येक क्षण capture झाले,
अपलोड करताच स्टेटस सारे,
रिप्लाय बघण्यात गर्क झाले ...
शुल्लक शुल्लक गोष्टींचे,
फोटो टाकतो आम्ही,
नाहीच आला कुणाचा रिप्लाय,
की क्षणात चिडतो आम्ही ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा