बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

सुखाची चटई ...

सुख आनंद चटई प्रेम नाते

आठवणी तर येतातच ...

क्षण ते आठवतातच ...

सुख ते क्षणभंगुर. ...

व्हावे वाटते खूप पुरस्कृत ...

क्षणिक सगळे ते विचार ...

नंतर वाटे दिवस यावे हेच पुन्हा...

आठवणींची ती चटई ...

गुंतत रहावी अखंड ती ...

एकमेकात गुंतता धागे ...

फुलून येतील नाते सारे ...

गुंतलेले ते मन बावरे ...

पाहिल नाते जवळून ते ...

कळतील मग हृदयातील स्पंदने ...

रीथम त्या स्पंदनाची ...

वाजे मनी ती धून सुखाची ...

बासरी त्या श्रीकृष्णाची ...

भाव मनी येतील मग ...

गंमत सारी नात्यातली ...

कळेल खरी किंमत प्रेमाची ...

मग अजूनच होईल गुतागुंत ...

बंधने लागतील करू गुंफण ...

करावी वाटेल प्रत्येकाला ...

आठवणींचा तो घट्ट धागा ...

कधी काळा, कधी पांढरा ...

काही मऊ, काही खरखरीत ... 

मिळेल तो धागा आपण ...

गोळा करायचा पुढ्यात मग ... 

त्यांना गुंफून बनवायची  ...

ती आठवणींची चटई ...

आयुष्याच्या संध्याकाळी निवांत ...

त्या जगाची सैर करण्यासाठी ...

स्वप्नरंगात फिरण्यासाठी ...

सुखाची ती झोप घेण्यासाठी ... 

आठवणींची ती चटई ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवा संसार ❤️

माहेर माझे बार्शी,  सासर आहे परांडा,  काय सांगू,  एका तासाच तर आहे,  अंतर यात,  बार्शी त आहेत भगवंत,  परंडा त आहेत अल्ला,  सासर माहेर जोडता ...