रविवार, १३ डिसेंबर, २०२०

आठवणी...❤️

आठवणी मैत्री विश्वास प्रेम खरी मैत्री जिगर दोस्त दोस्ताना कट्टर दोस्ती

आठवतात त्या आठवणी ,
जिथे माझ नाही आपल होत , 
दाताने तोडलेले का असेना ,
अर्ध चॉकलेट सुद्धा वाटून खायचो ...

आठवतात त्या आठवणी ,
जिथे तू नाही तर मी नाही ,
खोट बोलून का होईना ,
शाळा मिळून बुडवायचो ... 

आठवतात त्या आठवणी ,
जिथे माझा मित्र नाही तर जिगर असायचा ,
दोघे एकत्र दिसलो तरी दुसर्‍यांना राग यायचा ,
पण आमचा दोस्ताना कट्टर असायचा ...

आठवतात त्या आठवणी ,
जिथे चूक माझी नाही तर तुझी असायची ,
एक्मेंकांवर ढकलून गोष्टी ,
सोबत मिळून सॉल्व्ह करायचो ...

आठवतात त्या आठवणी ,
जिथे तू माझा मी तुझा घरी , 
ढापा मारून का असेना ,
पण भेटायचो चहा च्या गप्पासाठी ...

आठवतात त्या आठवणी ,
जिथे टेंशन तुझे मी माझे तू , 
टिंगलीत का होईना टेंशन घ्यायचो ,
परत मिळून दुराही करायचो ...

आठवतात त्या आठवणी ,
जिथे मी तुझाशी तू माझाशी भांडायचो ,
एकमेकांवर खूप रागवायचो रूसायचो ,
पण प्रेम मात्र खूप करायचो ...

आठवतात त्या आठवणी ,
जिथे तुझा माझ्या मैत्रीच्या , 
पुसट जरी असल्या त्या खुणा , 
तरी त्यात रमून जायला ...

आठवतात त्या आठवणी ,
जिथे मूल मुलीच्या, मुलगी मुलाच्या प्रेमात असलेल्या ,
जगात सुद्धा आपण आपले ,
मैत्रीच्या बंधनात होतो ... 

आठवतात त्या आठवणी , 
जिथे तुझी आणि माझी मैत्री ,
डोळ्यात सलणारी असली तरी ,
दिखाव्याची कधीच नव्हती ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवा संसार ❤️

माहेर माझे बार्शी,  सासर आहे परांडा,  काय सांगू,  एका तासाच तर आहे,  अंतर यात,  बार्शी त आहेत भगवंत,  परंडा त आहेत अल्ला,  सासर माहेर जोडता ...