मैत्री असावी,
खळखळत्या वाहत्या
नदीसारखी,
रातराणीच्या सुगंधासारखी
आकाशात दरवळणारी ...
मैत्री असावी,
गुलाबाच्या पाकळ्या सारखी
प्रेमाने एकमेकात
घट्ट धरणारी ...
मैत्री असावी,
मंद वाऱ्यासारखी
केसाची बट अलगद
झुलवणारी,
मनसोक्त हसणारी,
संकटसमयी धावुन
येणारी ...
मैत्री असावी,
शहाळा प्रमाणे
वरून कठीण पण आत थंड आणि
मधुर पाण्यासारखी ...
मैत्री असावी,
पावसाच्या
पहिल्या सरीसारखी
सुखाच्या सरींनी
चिंब भिजवणारी ...
मैत्री असावी,
जेवनातल्या मिठासारखी,
नसेल तर बेचव आणि असेल तर,
रुचकर जेवनासारखी ...
मैत्री असावी,
पहाटेच्या धुक्यासरखी,
थंडावा देणारी ...
मैत्री असावी,
उगवत्या सूर्या सारखी
नवा आशेचा किरण होऊन
आयुष्य तेजोमय कराणारी ...
मैत्री असावी,
पारिजातकाच्या फुलासारखी
नेहमी आंगण
सुगंधित करणारी ...

Matriche nate sangnari bhavdarshak kavita....
उत्तर द्याहटवाThank you 😊
हटवा