पंढरीच्या विठुराया
कित्येक वर्षांची तुझी परंपरा
आज थांबली ना रे
महामारी ने या
युगे अठ्ठावीस उभा
भक्तासाठी विठेवर तू
करमेल का रे तुला
भक्ताला भेटल्या वाचून
आई रुक्मिणी सुद्धा
रुसली ना रे भक्तावर
पहिल का रे ती वाट
भक्ताची या आतुरतेने परत
किती दिवस झाले
नाही गर्दी चंद्रभागे वर
आषाढी तर गेली देवा
आता कर्तिकीला तरी
होईल का रे भेट आपली
उभा वाळवंट सारा
रिकामा राहील दिवस तरी किती
आस तुझा दर्शनाची
लागली आम्हा भक्ताला
आषाढीला ऐकलं देवा
आलो नाही भेटीला
कर्तिकिला तरी आता
घेशील का रे भेट देवा
सगळ्या जगाचा रे बाप तू
लेकराच संकट तुला
करता नाही का येत दूर
घालऊन टाक ती महामारी
मारून टाक तो कोरोणा
राहू दे देवा आता
मस्कफ्री सगळ्यांना
मास्कफ्री सगळ्यांना

निघुन जाईल वेळ राहतील त्या आठवणी ...
उत्तर द्याहटवाया कठीण वेळेतही साथ नाही सोडली माझ्या विठाईनी ...
खरे आहे....Thanks
उत्तर द्याहटवा