बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२०

मैत्रीच नात...❤

मैत्रीचं नातं बंध प्रेम मने

मैत्रीच नात काही वेगळच असत,
कधी भेटतो, कधी बोलतो,
कधी संवाद होतो आणि मन जुळतात 
कळतच नाही...
       
    मैत्रीच नात काही वेगळच असत,
    जुळली मने, जुळले विचार,
    कधी जुळतात भावना आणि बंध, 
    कळतच नाही...
मैत्रीच नात काही वेगळच असत,
कधी भांडलो, कधी रुसलो,
कधी मन आणि ह्रुदय जुळत, 
कळतच नाही...
    मैत्रीच नात काही वेगळच असत,
    कधी चिडलो, कधी ओरडलो,
    कधी एकमेकात आणि मनामनात कनेक्ट होऊन जातो, 
    कळतच नाही...
मैत्रीच नात काही वेगळच असत,
कधी भावनात, कधी अंतर-मनात,
कधी त्या मैत्रिच्या कट्ट्यावर तासंतास बसुन राहतो, 
कळतच नाही...
    मैत्रीच नात काही वेगळच असत,
    कधी दुखः सांगताना, कधी सुख आठवताना,
    कधी माया आणि जीवाला जीव देउन जातो, 
    कळतच नाही...
मैत्रीच नात काही वेगळच असत,
कधी किस्से ऐकताना, कधी किस्से ऐकवताना,
कधी मैत्रीत आणि कधी मैत्रीच्या सोनेरी क्षणात गुंतुन जातो, 
कळतच नाही...❤

७ टिप्पण्या:

नवा संसार ❤️

माहेर माझे बार्शी,  सासर आहे परांडा,  काय सांगू,  एका तासाच तर आहे,  अंतर यात,  बार्शी त आहेत भगवंत,  परंडा त आहेत अल्ला,  सासर माहेर जोडता ...