शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२०

आई

आई

आई बद्दल काय लिहू
लिहिल तेवढं कमीच आहे,
जगात साऱ्या माझा मनात
तीच सर्वस्वी देव आहे. 

जगात या येण्या आधी मी
ठेवला विश्वास एवढा तू
फेडू शकेल का ग मी
थोड तरी तुझ ऋण. 

पडले असतील कष्ट तुला
मला आजवर पोसायला,
म्हातारपणी तुझा मी
प्रयत्न तरी करेल जपायचा तुला.

इतके माझे लाड पुरवले
एका शब्दाने बोलली नाहीस,
परताव्यात त्याचा तुझा मी
करू शकेल का भर थोडी.

प्रत्येक गोष्ट शिकवताना
नसशील का ग दमली तू,
यशासाठी माझा तरीही
केले किती प्रयत्न तू.

आशीर्वाद कायम तुझा
असुदेत माझा डोक्यावर,
प्रत्येक कार्यात माझा
असुदेत सहभाग कायम.

जेव्हा माझावर सावली तुझी
नाही डगमनार मी कधी,
माझा प्रत्येक गोष्टीत मला
साथ फक्त तुझी हवी.

प्रत्येक जन्मात मला मिळावी
आई फक्त तू आणि तू,
कुशीत तुझ्या मला तू
घेशील का ग परत तू.

जगात सगळ्या या तू
आहे लय भारी तू,
प्रत्येक लेकराला
आई तुझा सारखी मिळो.

बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२०

दसर्याला आपट्याचे पान सोन म्हणुन का लुटतात ?

आपट्याचे पान

 दसर्याला आपट्याचे पान सोन म्हणुन का लुटतात ?

 हस्तिनापुर म्हणजे कुरुराजांची समर्थ्यशाली आणि संपन्न राजनगरी. हि राजनगरी महापराक्रमी योध्यांची आहे. अनेकविध अनेकविध कलाकरांनी नटलेली हि नगरी आहे. मोठ्मोठे वाडे, मंदिरांची शिख़रे यांनी समृद्ध अशी हि नगरी आहे. या नगरी मधे शंतनु नावाचा एक मोठा राजा होता. हा राजा कुरुराजांच्या वंशाचाच होता. याला दोन पुत्र होती. एक धृतराष्त्र व दुसरा पंडुराजा होय. धृतराष्त्र व पंडुराजा दोघेहि शुर, पराक्रमी योद्धे होते. दोघानाही राज्यकारभाराचे अतिशय ज्ञान होते. दोघेहि सर्व गुण संपन्न होते. नंतर पुढे दोघांचाही विवाह झाला. धृतराष्त्र यांचा विवाह गांधारी सोबत तर पंडुराजा यांचा विवाह कुंती यंच्याशी झाला. सगळ काहि छान चाललेल असत.

  धृतराष्त्र व गांधारी यांना शंभर पुत्र होतात. त्यांना कौरव म्हणतात. तर, पंडुराजा व कुंती यांना पाच पुत्र होतात. त्यांना पांडव असे म्ह्णतात. पुढे जाउन यांच्यात युद्ध व्हायला लागत. ते खुप वाढतच जात. त्यात त्यांच युद्ध करायच ठरत, त्यात अट अशी असते कि, जो हारेल त्याला बारा वर्ष अज्ञान वणवास भोगावा लागेल. अज्ञान वणवास म्हणजे विरुद्ध स्पर्धकाला आपण वणवास भोगत आहोत, तो कुठे भोगत आहोत, कश्या परिस्थीतीत आहोत हे कळता कामा नये, जेव्हा ते कळेल तेव्हा केलेला सगळा वणवास संपुष्टात येउन, त्या दिवसा पासुन परत नविन बारा वर्षाचा कालखंड चालु होईल. असे ठरते. जिंकेल त्याला यात पांडव हरतात. पाडवांना राज्य मिळु नये यासाठी कौरव सतत प्रयत्नशिल असयचे. परंतु अचानक काही कालखंडा नंतर विराट नगरी मधे पांडव त्यांचा वणवास पुर्ण करतात. आणि विराट नगरी मधे प्रगट होतात. आणि हा एवढा कठीण विजय पांडव मिळवतात. याचा जल्लोश, आनंद म्हणुन ते त्यांची शस्त्रे आपट्याच्या झाडावर मारतात व त्याची पाने घेउन कौरवांकडे येतात, आणि हा दिवस दशमी चा असतो, दशमी च्या दिवशी मिळालेला हा विजय, वाईटावर चंगल्याचा विजय, अंधकारावर प्रकाषाचा विजय, म्हणुन हा दशामिचा दिवस विजयाचा दिवस विजयादशमी म्हणुन सजरा करतात, व या दिवशी प्रात्येक लहान व्यक्ती मोठ्या व्यक्तीला अपट्याची पाने सोने म्हणुन देतो.

मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२०

गुरुजी तुम्ही फक्त शाळा सुरु करा

गुरुजी तुम्ही फक्त साळा सुरु करा

बस झाल आता
या कोरोनाची मजा
गुरुजी तुम्ही फक्त
शाळा सुरु करा 

ऑनलाईन शिक्षण
शिरत नाही डोक्यात
तुमच्या समोर बसुन
पाठीत नाही बसत दनका

आई बाबा म्हणतात
पोट भरायला सुद्धा
पैसा नाही जवळ आता
तुझासठी कुठुन आणु
रिचार्ज साठी पैसा

मोबाईल असुद्यात कितिही
थ्रिजी किंवा फोरजी
म्हाला आठवतात आता
फक्त आमचेच गुरुजी.

मैदानावर मित्रांसोबत डबे खायची,
खेळायची होती वेगळी मज़ा
आता ऑनलाईन सगळे असुन
तशी येत नाही मज़ा

बसुन सगळे मित्र 
घलतील गोंधळ वर्गात
तासाला सगळे खातील 
चोरुन वर्गात डबा

म्हणुन् संगते गुरुजी
तुम्ही फक्त शाळा सुरु करा
अम्ही रोज येतो शळेत
तुमचा मार खयला

गुरुजी तुम्ही फक्त 
शाळा सुरु करा
गुरुजी तुम्ही फक्त
शाळा सुरु करा

रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०

स्त्री ...

स्त्री शक्ति stri shakti power womens महिला नारी

        
आपण पाहतो अहोत, जगात अदर्श असणारे छ्त्रपती शिवाजी महाराज यांना घडवनार्या राजमाता जिजाउ आईसाहेब या एक स्त्री च होत्या, झाशी ची राणी इंग्रजांशी दोन हाथ करणार्या राणी लक्ष्मीबाई, पहिल्या महिला शिक्षिका सवित्रीबाई फुले, महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटिल, महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, स्त्री सुधाकर व थोर समाज सेविका रमाबाई रानडे, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, भारतीय क्रिकेटपटू मैथीली राज, थोर लेखीका गौरी देशपांडे, जागतीक बॉक्सिंगपटू मेरीकोम, ब्यॉड्मिंटनपटू सायना नेह्वाल आदि यशस्वी स्त्रीया च आहेत.

      स्त्री, नारी हि एक व्यक्ति नसुन, शक्ती च एक व्यासपिठ आहे. शांती पासुन ते उद्रेका पर्यंत सर्व रुपे ही वेगवेगाळ्या परिस्थितित पहायला मिलतात. स्त्री हि जीतकी सुंदर असतेप्रेमळ असतेमायाळु असतेतरी ती शांत असते, त्याचा कुठेही उद्धार करत नाहीकोणी काही म्हणाले तर त्याचे मनाला लाउन घेत नाही. तीला खुप जीव लावायची सवय असतेकोणी काहिहि म्हणोती तीचे कर्तव्य पुर्ण करत असते. ती कधीही तिच्या कर्तव्या पासुन मागे हटत नाही.

      प्रत्येक पुरुषाच्या जीवनात साडेतीन शक्तिपीठे असतात. पहिल शक्तिपीठ म्हणजे त्याची आईदुसर शक्तिपीठ म्हणजे त्याची बहिणतिसर शक्तिपीठ म्हणजे त्यची पत्नी आणि आर्धपिठ म्हणजे त्याची मुलगी. एक त्याला जन्म देतेदुसरी त्याला माया लावतेतिसरी त्याला जिवनच देतेतर चौथी त्याचा जीव असते. या साडेतीन शक्तिपीठांना प्रेम द्यामाया लावात्यांच्या सर्व ईछा पुर्ण करात्यांना आनंदी ठेवाघरात त्यंच्यावर अन्याय होईल असे कधी वागु नकातत्यंच्यावर हात उचलणे म्हणजे आपला पुरुषार्थ नव्हेतर तिच्यावर उचलण्यात येणार्या हाताला थांबवनत्यासाठी केलेले प्रयत्न म्ह्णजे खरा पुरुषार्थ होय.

      घर जरी मेहनत करुन बांधल जात असल तरी, त्या घराला घरपण हे फक्त स्त्री मुळेच मिळत एवढ मात्र नक्की. घरात आई नसेल तर, घर सुन सुन वाटतघरात संस्कार नसतातघरात बहीण नसेल तर, बडबड नसतेसमारंभ नसतोघरात बायको नसेल तर, संस्कृती नसतेसन नसतातआणि मुलगी नसेल तर, घरात किलबिलाट नसतोउस्तव नसतो. स्त्री हि जीवनातला आनंद आहे. स्त्री हि जीवन जगण्याची एक उत्तम साथी आहे. स्त्री च्या असण्याने जीवनातील दुखःचे डोंगर सर करायला एक नविन उर्जाप्रेरनाशक्तीआत्मविश्वास निर्माण होतो.

      स्त्री ही खूप मायाळू देखील असते, तिच्या मध्ये सहकार्‍याची भावना अगदी ठासून भरलेली असते. याच एक उत्तम उदाहरण द्यायचं झाल तर अस की, जर एका ठिकाणी महिलांचा एखादा मोठा समूह असेल तर, ते त्यांचं काम मनापासून तर करतातच परंतु त्या एकमेकिना सहकार्य देखील करतात. त्या खूप हळव्या मनाच्या असतात. त्या लगेच कोणत्याही गोष्टीवरून त्यांचं मत बदलतात कारण त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारची वाईट भावना, एखाद्या व्यक्तीबद्दल द्वेष नसतो. त्या एकदम सरळ स्वभाव च्या असतात. त्यांना कोणतीही गोष्ट लगेच पटते.

      स्त्री ही प्रत्येक कुटुंबाला मिळालेली एक उत्तम भेट आणि दैवी शक्ति आहे. घरात दिवसभर जे पडेल ते काम करणार, मुलांना खूप चांगले संस्कार करणार, ते आजारी पडले तर प्रसंगी आई परिचारिकेचे काम देखील अगदी चोख पूर्ण करते. नवर्‍याला कामात मदत करताना ती कधी त्याची सहकारी होऊन जाते, कळतही नाही. घरात वयोवृद्ध लोक असतील तर, त्यांची सेवा करण्यात स्त्री कोणत्याही कामात मागे पुढे बघत नाही, आणि लाजत देखील नाही. स्त्री ही समस्ये नुसार स्वतः ला अगदी त्या गोष्टीत सामावून घेते, त्या परिस्थितीत स्वतः ला एकरूप करून घेते. प्रत्येक गोष्टीसाठी तिच्या कडे उत्तम उपाय असतो, ती कठीण परिस्थितीत मार्ग काढायला, कठीण प्रश्नांना सामोरे जायला, स्वतः उत्तर म्हणून उभी असते. तिला सगळ्यांसाठी स्वतः ला झोकून द्यायला खूप आवडत, तिला सगळ्यांसाठी वेळ असतो, परंतु स्वतः कडे लक्ष कधीच देत नाही. यात तिला फक्त आपल्या माणसांचं, आणि आपल्या कुटुंबाच सुख महत्वच असत, घरातली माणसे सुखी आणि आनंदी झाली की तिलाही आनंद होतो. तिला आनंद देण्यासाठी वेगळं अस काही करायची गरज नसते, तुम्ही फक्त तुमचा आनंद तिला सांगा, तुमचं यश तिला सांगा ती मनातून खूप आनंदी होते.

      स्त्री ही प्रत्येक भूमिकेत राहू शकते. स्त्री आयुष्यातून गेली तर त्या पुरुषाला सगळं सांभाळून घेण एकवेळ कठीण जात. तो खूप खाचतो. काही गोष्टी पूर्ण करण्यास असमर्थ ठरतो, पण तेच स्त्री च्या बाबतीत घडल्यास ती तिची कंबर बांधून सगळ्या गोष्टींना सामोरे जाण्यास सज्ज असते. समाजात असे कितीतरी उदाहरण आहेत की, स्त्री घर सांभाळून बाहेरची कामे देखील खूप यशस्वी रित्या पूर्ण करते. ती डगमगून जात नाही. ती कनखरपणे उभी राहते, सगळ्या जबाबदर्‍या व्यवस्थित पूर्ण करते.

      एका स्त्री ला तिचा अभिमान द्यातिला तिचा मान, सन्मान द्यातिला कधिही असुरक्षीत वाटू देऊ नकाया दगदगीच्या जिवनात मिळाला तर थोडा वेळ तिला द्या. जेव्हा या जगात एक स्त्री मनात कोनतिही भिती न बाळगता फिरेलतेव्हा खरा स्त्री शक्तिचा झालेला सगळ्यात मोठा सन्मान असेल.   

बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२०

मैत्रीच नात...❤

मैत्रीचं नातं बंध प्रेम मने

मैत्रीच नात काही वेगळच असत,
कधी भेटतो, कधी बोलतो,
कधी संवाद होतो आणि मन जुळतात 
कळतच नाही...
       
    मैत्रीच नात काही वेगळच असत,
    जुळली मने, जुळले विचार,
    कधी जुळतात भावना आणि बंध, 
    कळतच नाही...
मैत्रीच नात काही वेगळच असत,
कधी भांडलो, कधी रुसलो,
कधी मन आणि ह्रुदय जुळत, 
कळतच नाही...
    मैत्रीच नात काही वेगळच असत,
    कधी चिडलो, कधी ओरडलो,
    कधी एकमेकात आणि मनामनात कनेक्ट होऊन जातो, 
    कळतच नाही...
मैत्रीच नात काही वेगळच असत,
कधी भावनात, कधी अंतर-मनात,
कधी त्या मैत्रिच्या कट्ट्यावर तासंतास बसुन राहतो, 
कळतच नाही...
    मैत्रीच नात काही वेगळच असत,
    कधी दुखः सांगताना, कधी सुख आठवताना,
    कधी माया आणि जीवाला जीव देउन जातो, 
    कळतच नाही...
मैत्रीच नात काही वेगळच असत,
कधी किस्से ऐकताना, कधी किस्से ऐकवताना,
कधी मैत्रीत आणि कधी मैत्रीच्या सोनेरी क्षणात गुंतुन जातो, 
कळतच नाही...❤

रविवार, ११ ऑक्टोबर, २०२०

Inner Circle

Inner Circle

''What you give others...it comes to you!''  😊
Inner Circle

        प्रत्येकाच स्वत:च अस एक इनर सर्कल असत मैत्रीच, नातेवाईकांच, व्यावसायिक ओळखींच, आणि हे इनर सर्कलच खरतर आपल्याही नकळत आपली स्ट्रेंथ असत. ''he/she or they are there!" या एका जाणीवेनेच निसरड्या वाटांवरून धडपडलो, उतारावरून घरंगळलो तरी हे सर्कल येईलच आपल्याला उचलायला, थांबवायला, धरायला हा विश्वास असतो. ''ज्याच हे इनर सर्कल स्ट्रॉग... तो खरा नशीबवान'' 👍 कारण हे इनर सर्कल तुम्ही एकटे असताना, जखमी असताना, चिखलानी बरबटलेले वा घाणीनी माखलेले असतानाही तुमच्याबरोबर असत. तुमच्यावर प्रेम करत, तुमच असत, आता हे इनर सर्कल काही अस रात्री सेट केल आणि सकाळी तयार झाल, असं नसत, तुमच्या बालपणापासून ते आज आत्ताच्या तुमच्या वागण्या बोलण्याचा अंश-पाक म्हणजे हे इनर सर्कल. IF you have a strong inner circle, means You are also a part of somebody's inner circle life reciprocates! कोणाची बालपणीची मित्रमैत्रीण ही त्या घट्ट बंधात असते., कधी काका, मामा, मावशी, कधी कलीग, बॉस, किंवा कोणीही हे इनर सर्कल मधल्या व्यक्ती किंवा ग्रूपशी आपण कधीही खोट बोललेलो नसतो, जे आहे ते तस त्यांना माहित असत., तिथे मुखवट्याची गरजच भासत नाही. या इनर सर्कलमधल्यांशी रोज आपण नेट, फोन, किंवा तत्सम माध्यमातून संपर्कात असतोच अस नाही, त्याची गरजही नसते, १-२ महिने ते वर्ष संपर्कात नसतानाही, एका फोनवर ते लगेच कनेक्टही होतात आपल्याशी.
        या इनरसर्कलला कधीही आपल्याबाबतीत शंका नसतात, संभ्रम नसतो, पैसे हवेत म्हटल तर का, कशाला, कधी परत? वगैरेची काहीही पडलेली नसते ह्यांना., ''ओके'' एवढाच तो आश्वासक शब्द असतो. या इनरसर्कलची, आपल्याला सुखाचे ग्लास किणकिणत "चीयर्स" म्हणताना कधीही गरज भासत नाही., पण तहान लागली तर घोटभर पाणी हेच बनतात. जे जगायला महत्वाचे! हे असे इनरसर्कल हवेच आपल्यालाही व आपणही कोणाचे तरी इनरसर्कल बनण्याचा प्रयत्न करावा. डीप्रेशन, आत्महत्या, सायकीअँट्री डीसीजेस फिरकतही नाहीत अशा ठिकाणी जिथे हे इनर सर्कल असत.
        जागे रहा, सजग व्हा. या ''प्लास्टिकच्या फुलांमधे गंध शोधत बसू नका.'' खरा सुगंध शोधा. त्यासाठी दगड, माती, चिखल, काटे, कुटे चे व्रण अंगावर सोसावे लागतात, रणरणत्या उन्हातून चाललात की " इनर सर्कल" च्या सावलीच बळं मिळत.

शनिवार, १० ऑक्टोबर, २०२०

सप्तरंगी हे मन माझे ...

saptrang man bhavana kadhi प्रेम बंध सप्तरंग मैत्री मन

कधी बोलते, कधी अबोला,
कधी रुसते तर कधी हसते,
मन हे माझे झुलते,
सप्तरंगी हे मन माझे ...

    कधी काळजी, कधी प्रेम,
    कधी विचाराने भरलेले, तर कधी सुन्न लाटा,
    मन हे माझे फुलते,
    सप्तरंगी हे मन माझे ...

कधी गुंतते, कधी सुटते,
कधी पावसात, तर कधी शब्दात,
मन हे माझे भिजते,
सप्तरंगी हे मन माझे ...

नवा संसार ❤️

माहेर माझे बार्शी,  सासर आहे परांडा,  काय सांगू,  एका तासाच तर आहे,  अंतर यात,  बार्शी त आहेत भगवंत,  परंडा त आहेत अल्ला,  सासर माहेर जोडता ...