शनिवार, ९ जुलै, २०२२

श्री हरी..🙏🚩


  • पांडुरंगाची उद्या मोठी आषाढी एकादशी आणि वारकरी संप्रदायाची अखंड वर्षाची परंपरा असलेली वारी आणि त्यामुळे निर्माण झालेलं अवघं भक्तिमय वातावरण व त्यात तो छान असा पांडुरंगाच्या आणि भक्ताचा संवाद अतूट नात या वर असलेली ही कविता 

  • श्री हरी..!!

  • पंढरीच्या विठुराया.....
  • खुलला ना रे चेहरा आज तुझा,
  • भक्तांच्या आगमनाने.....
  • पंढरी दंगली ना रे आज,
  • दोन वर्षाच्या खंडानंतर.....
  • लेकरांना भेटणार ना रे परत आज,
  • किती तो प्रसन्न अन् हसरा चेहरा.....
  • डोळे पाणावले ना रे पाहून आज
  • लेकरांवरचा जीव.....
  • दिसला की रे या पावसाला पाहता,
  • तुला पाहून डोळे भरतील वारकऱ्यांचे,
  • हे पाहून.....
  • तूला ही आवरले नसतील तुझे डोळे, 
  • म्हणून की का रे पाडल्यास 
  • या रिमझिम संतत...धारा, 
  • पावसाच्या सरींनी.....
  • वाहून जातील ना सारे ते अश्रू ,
  • त्या पावसाच्या थेंबात..... 
  • पंढरीच्या पांडुरंगा.....
  • मानलं रे बाबा तुला आज,
  • अवघ्या जगाच संकट,
  • दूर केलं की रे सार आज,
  • संसर्गाच्या भीतीपोटी.....
  • दारात सुद्धा येत नव्हतं ना रे कोणी,
  • आज पाहून ही वारी.....
  • डोळे पाणावले ना रे सारी,
  • खर सांगू विठ्ठला.....
  • चिडलो होतो ना रे तुझावर फार,
  • पण तू विठेवर उभारून.....
  • केलं ना रे सगळं ठीक पुन्हा
  • खर सांगू पंढरीनाथा.....
  • असाच राहू दे ना रे गोडवा आपल्यात,
  • रुक्मिणी आणि विठ्ठलाची.....
  • भेट व्हावी आता प्रत्येक वारीला
  • पुन्हा-पुन्हा जन्म व्हावा या महाराष्ट्रात.....
  • आणि दर्शन व्हावं वारीच, 
  • जन्मोजन्मी विठ्ठलाचं या.....

  • रामकृष्ण हरी 🙏🚩
  • श्वेता घुमरे, बार्शी 😊
  • #vitthal #पांडुरंग #पंढरपूर #बार्शी #भगवंत #वारी #वारकरी #वारकरी_सांप्रदाय #vitthalrukhmini #श्रीहरी
  • #स्वप्नगांध #swapngandh #blog #कविता 
  • https://swapngandh.blogspot.com/2022/07/blog-post.html 

रविवार, २६ सप्टेंबर, २०२१

मैत्रीचे बोल


मैत्री बोल शब्द गोष्टी आठवणी किस्से मजा कॉलेज शाळा दिवस

मैत्री तुझी आणि माझी
गोड आठवणींचा खजिना
फिरलो नाहीत कुठे
फोटो च पण ढीग झाला

भांडायचे तर रोजच असते
सॉरी थँक्यू विणा दिवसच नसे
तरी असे आस भेटायची
भेटून थोडतरी बोलायची

सगळी मत जुळतात
मॅचिंग सुद्धा आपोआप होतात
ठरून करतच नसलो तरी
आपोआप ते घडतात

आपल्या मैत्रीची ओढ
आपल्यापेक्षा जास्त दुसऱ्यानाच खूप
भेटलो नुसते जरी आपण
नजरा सगळ्यांच्या होतील वर

आपल्या मैत्रीचा तर कट्टा
आता सगळ्यांनाच कळला असावा
तरी त्याची खात्री मात्र
करण्याचा अट्टाहास मात्र संपेना

कधी आणि कसे भेटलो
आता नाही आठवत मला
मैत्री मात्र अशी झालिये की
नाही ती विसरायची मनामनात

किस्स्यांची तर लुडबुड च फार
भेटायचं नसलं तरी
ते सांगण्यासाठी का होईना
मनाची घालमेल होते फार

कॉलेज शाळेचे ते दिवस
गेले असतील जरी दूर
एकत्र मिळून दंगा करायची
मजा अजूनही नाही गेली पण

मी असेल उद्या नसेल
मैत्री ठेव कायम मनात
केव्हाही वाटेल तुला
एक कॉल नक्की कर मला

मी म्हणत नाही नेहमी
आठवावी मीच तूला
मात्र एकदातरी आठवड्यात
भेटायची इच्छा व्हावी फार

श्वेता घुमरे. बार्शी

मंगळवार, १३ एप्रिल, २०२१

नववर्षाभिनंदन

नववर्षाभिनंदन  नवे वर्ष, नवी उमेद, स्वप्न दवाबिंदू नवे स्वप्न, नवी उमेद, वर्ष जावे सुखर.

 नवे वर्ष, नवी उमेद,
नवे स्वप्न, नवी फुले,
पाकळी अलगद भिजावी,
दवाबिंदूच्या त्या थेंबाने,
आठवणींच्या त्या ओलाव्याने,
पाकळीच्या त्या सुगंधाने,
वर्ष जावे बहरलेले,
डोळ्यांनी मग स्वप्न पहावे,
नवरंगाचे गाणे गावे,
मनानेही मग उडावे,
पूर्तीसाठी आयुष्य वाहावे,
सकल्प करूया साधा सरळ,
सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करुयात,
वर्ष जावे सुकखर.

समाधान

समाधान समाधान म्हणजे काय खूप जणांना सुख असतं पण समाधान नसतं तर काही जणांना कमी सुख असल तरी खूप समाधान असतं याचं नक्की कारण काय असावं. समाधान...