पांडुरंगाची उद्या मोठी आषाढी एकादशी आणि वारकरी संप्रदायाची अखंड वर्षाची परंपरा असलेली वारी आणि त्यामुळे निर्माण झालेलं अवघं भक्तिमय वातावरण व त्यात तो छान असा पांडुरंगाच्या आणि भक्ताचा संवाद अतूट नात या वर असलेली ही कविता- श्री हरी..!!
- पंढरीच्या विठुराया.....
- खुलला ना रे चेहरा आज तुझा,
- भक्तांच्या आगमनाने.....
- पंढरी दंगली ना रे आज,
- दोन वर्षाच्या खंडानंतर.....
- लेकरांना भेटणार ना रे परत आज,
- किती तो प्रसन्न अन् हसरा चेहरा.....
- डोळे पाणावले ना रे पाहून आज
- लेकरांवरचा जीव.....
- दिसला की रे या पावसाला पाहता,
- तुला पाहून डोळे भरतील वारकऱ्यांचे,
- हे पाहून.....
- तूला ही आवरले नसतील तुझे डोळे,
- म्हणून की का रे पाडल्यास
- या रिमझिम संतत...धारा,
- पावसाच्या सरींनी.....
- वाहून जातील ना सारे ते अश्रू ,
- त्या पावसाच्या थेंबात.....
- पंढरीच्या पांडुरंगा.....
- मानलं रे बाबा तुला आज,
- अवघ्या जगाच संकट,
- दूर केलं की रे सार आज,
- संसर्गाच्या भीतीपोटी.....
- दारात सुद्धा येत नव्हतं ना रे कोणी,
- आज पाहून ही वारी.....
- डोळे पाणावले ना रे सारी,
- खर सांगू विठ्ठला.....
- चिडलो होतो ना रे तुझावर फार,
- पण तू विठेवर उभारून.....
- केलं ना रे सगळं ठीक पुन्हा
- खर सांगू पंढरीनाथा.....
- असाच राहू दे ना रे गोडवा आपल्यात,
- रुक्मिणी आणि विठ्ठलाची.....
- भेट व्हावी आता प्रत्येक वारीला
- पुन्हा-पुन्हा जन्म व्हावा या महाराष्ट्रात.....
- आणि दर्शन व्हावं वारीच,
- जन्मोजन्मी विठ्ठलाचं या.....
- रामकृष्ण हरी 🙏🚩
- श्वेता घुमरे, बार्शी 😊
- #vitthal #पांडुरंग #पंढरपूर #बार्शी #भगवंत #वारी #वारकरी #वारकरी_सांप्रदाय #vitthalrukhmini #श्रीहरी
- #स्वप्नगांध #swapngandh #blog #कविता
- https://swapngandh.blogspot.com/2022/07/blog-post.html
शनिवार, ९ जुलै, २०२२
श्री हरी..🙏🚩
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
नवा संसार ❤️
माहेर माझे बार्शी, सासर आहे परांडा, काय सांगू, एका तासाच तर आहे, अंतर यात, बार्शी त आहेत भगवंत, परंडा त आहेत अल्ला, सासर माहेर जोडता ...
-
मैत्रीच नात काही वेगळच असत , कधी भेटतो , कधी बोलतो , कधी संवाद होतो आणि मन जुळतात कळतच नाही... मैत्रीच नात काही वेगळच असत , ...
-
आई बद्दल काय लिहू लिहिल तेवढं कमीच आहे , जगात साऱ्या माझा मनात तीच सर्वस्वी देव आहे. जगात या येण्या आधी मी ठेवला विश्वास एवढा तू फेडू शकेल...
-
Inner Circle ''What you give others...it comes to you!'' 😊 प्रत्येकाच स्वत:च अस एक इनर सर्कल असत मैत्रीच, नात...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा