नवे स्वप्न, नवी फुले,
पाकळी अलगद भिजावी,
दवाबिंदूच्या त्या थेंबाने,
आठवणींच्या त्या ओलाव्याने,
पाकळीच्या त्या सुगंधाने,
वर्ष जावे बहरलेले,
डोळ्यांनी मग स्वप्न पहावे,
नवरंगाचे गाणे गावे,
मनानेही मग उडावे,
पूर्तीसाठी आयुष्य वाहावे,
सकल्प करूया साधा सरळ,
सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करुयात,
वर्ष जावे सुकखर.

