सकाळी सकाळी लवकर उठून
शरीरासाठी Exercises करू
दिवसभरात न दमण्यासाठी
पुन्हा एकदा रिचार्ज करू
दिवसभराचा अढावा घेऊ
एकत्र बसून मस्त
नाष्टा घेत कुटुंबासमवेत
पुन्हा एकदा रिचार्ज करू
ऑफिस चा तो पोशाख घालून
निघण्याची तयारी करू
सहकाऱ्यांच्या कॉल वर
पुन्हा एकदा रिचार्ज करू
सायंकाळी कट्ट्यावर बसू
कामाच्या त्या सुटकेचा सुस्कारा सोडू
चहाच्या त्या कपाने
पुन्हा एकदा रिचार्ज करू
मित्र मैत्रिणीच्या गाठी घेऊन
मस्त गप्पा मध्ये रमून जाऊ
खांद्यावरच्या हातावर डोकं ठेऊन
पुन्हा एकदा रिचार्ज करू
रात्रीच्या त्या चंद्र प्रकाशात
आठवणींना उजाळा देऊ
प्रेमाच्या त्या दुनियेत मग
पुन्हा एकदा रिचार्ज करू

