कधी बोलते, कधी अबोला,
कधी रुसते तर कधी हसते,
मन हे माझे झुलते,
सप्तरंगी हे मन माझे ...
कधी काळजी, कधी प्रेम,
कधी विचाराने भरलेले, तर कधी सुन्न लाटा,
मन हे माझे फुलते,
सप्तरंगी हे मन माझे ...
कधी गुंतते, कधी सुटते,
कधी पावसात, तर कधी शब्दात,
मन हे माझे भिजते,
सप्तरंगी हे मन माझे ...

Mast kavita
उत्तर द्याहटवा👍👍☺️
उत्तर द्याहटवाThank You
हटवा