
माहेर माझे बार्शी,
सासर आहे परांडा,
काय सांगू,
एका तासाच तर आहे,
अंतर यात,
बार्शी त आहेत भगवंत,
परंडा त आहेत अल्ला,
सासर माहेर जोडता जोडता,
झाले मी माझ्या
कृष्णाची आता,
आई ने दिली माया,
बाबांनी दिले प्रेम,
सासरी खुश आहे,
कारण प्रेमाने वागवतात सगळे,
नव्या संसाराची नवी गोष्ट,
सांगायची आहे सगळ्यांना,
दीर माझे आहेत हौशी,
वहिनी देतात सारी खुशी,
लाडाचा शौनक करी मामी मामी........
भाच्याची हाऊस च न्यारी,
सोनल ताई सांगतात,
संसारातील गंमती जमती,
भाऊजी आहेत मार्गदर्शक भारी,
बाकी सारे आप्तेष्ट,
नंदा आणि वहिनी,
सारे आहेत सवंगडी,
काका काकू अत्त्या मामा,
वरिश्ठ सारे मंडळी,
वाढवतात संसाराची गोडी,
या सगळ्यां समवेत,
शिकतेय नवीन डाव,
चालत आहे पुढे पुढे.......
नव्या आयुष्याची नवी वाट,
अशीच बहरत जावो,
सगळ्यांच्या आशीर्वादाने,
माझ्या नव्या संसाराची,
नवी वाट.........

