गोड आठवणींचा खजिना
फिरलो नाहीत कुठे
फोटो च पण ढीग झाला
भांडायचे तर रोजच असते
सॉरी थँक्यू विणा दिवसच नसे
तरी असे आस भेटायची
भेटून थोडतरी बोलायची
सगळी मत जुळतात
मॅचिंग सुद्धा आपोआप होतात
ठरून करतच नसलो तरी
आपोआप ते घडतात
आपल्या मैत्रीची ओढ
आपल्यापेक्षा जास्त दुसऱ्यानाच खूप
भेटलो नुसते जरी आपण
नजरा सगळ्यांच्या होतील वर
आपल्या मैत्रीचा तर कट्टा
आता सगळ्यांनाच कळला असावा
तरी त्याची खात्री मात्र
करण्याचा अट्टाहास मात्र संपेना
कधी आणि कसे भेटलो
आता नाही आठवत मला
मैत्री मात्र अशी झालिये की
नाही ती विसरायची मनामनात
किस्स्यांची तर लुडबुड च फार
भेटायचं नसलं तरी
ते सांगण्यासाठी का होईना
मनाची घालमेल होते फार
कॉलेज शाळेचे ते दिवस
गेले असतील जरी दूर
एकत्र मिळून दंगा करायची
मजा अजूनही नाही गेली पण
मी असेल उद्या नसेल
मैत्री ठेव कायम मनात
केव्हाही वाटेल तुला
एक कॉल नक्की कर मला
मी म्हणत नाही नेहमी
आठवावी मीच तूला
मात्र एकदातरी आठवड्यात
भेटायची इच्छा व्हावी फार
श्वेता घुमरे. बार्शी
