ऑनलाईन च्या जमान्यात
कोणी भेटेना सत्यात
व्हॉट्स अँप इंस्टाग्राम वर
हल्ली भेटतात एकमेकांना ...
रुसवे गोडवे सारे काही
नुसते झाले फिलिंग साठी
शब्दातून कसे जाणवतील
भावना त्या मनातील ...
स्पर्श सारे झाले अबोल
इमोजीतूनच व्यक्त झाले सारे बोल
अव्यक्त त्या मनातील भावना
दडून राहिल्या तश्याच मग ...
कसे जगत आहोत आपण
मेसेज च्या या दुनियेत
खऱ्या जाणिवा विसरून सगळे
झाले शब्दांचेच प्यादे ...
मेसेज वर कळतात सगळे
सुखात आहेत की दुःखात कोण
पण चुकूनही भेटत नाहीत
आवर्जून एकमेकांना कोण ...
Gm आणि Gn ची तर
प्रथाच पडली जणू
ढीगभर शुभेच्छांच्या गर्दीत
माणूस आहे का माणसा समोर ...
मोबाईल कॉम्प्युटर च्या युगात
नुसता फॉर्मालिटी चा हा जमाना
ना कळतो तो फिलिंग चा आवाज
ना येते ती आपलेपणाची भावना ...
शब्द च आहेत प्रश्न
त्यातूनच द्यायचे उत्तर
ना राहिले काही एकमेकात
ना राहिले ते सुखी जीवन ...
फरफटून गेले सगळे
